काँग्रेसला गांधी परिवाराच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल. त्यातच पुनरुज्जीवनाची बीजे आहेत.
काँग्रेस पक्षाने हा विचार करायला हवा की, लोकशाही मूल्यांना आपण कशा पद्धतीने उजागर करू शकू, यशस्वी करू शकू? केवळ निवडणुका लढवणारा पक्ष, इतक्या मर्यादेत राहून आता चालणार नाही. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील, त्या करण्यासाठीचे एक साधन बनून पक्षाला प्रयत्न करावे लागतील. सामाजिक बदलासाठी झटणारा, लोकोपयोगी पडणारा पक्ष असा आकार स्वत:ला द्यावा लागेल.......